शांतता या जीवनी यावी कशी ?
अन सुखाची वाट चालावी कशी ?
ग्लास नाही बर्फ नाही खाद्य ना
एकट्याने बाटली प्यावी कशी ?
कुंपणावर बैसलो आयुष्यभर
प्राक्तनाशी झुंज मग ध्यावी कशी ?
वैद्य म्हणती जागरण मदिरा नको
सांज मग ती रोज ढकलावी कशी ?
विसरणे काही न शिकणे अनुभवे
माणसाची जात सुधरावी कशी ?
लाच देण्या लागलेली रांग ही
सांग लज्जा "किरण "सोडावी कशी ?
--किरण जोगळेकर--